दिव्यत्वाची जेथे प्रचिती- तेथे कर माझे जुळती*!

होय मित्रांनो- कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जो कर्म करतो त्याला- निष्काम कर्मयोगी म्हणतात! अशा कर्मयोग्याचं दर्शन झालं की नमस्कारा साठी आपलेहात आपोआप जुळतात—-मित्रांनो आपले विचार आणि आपला चांगुलपणा हा आपल्या कृतिशील  कर्तुत्वावर समाज ठरवत असतो.

परमेश्वराने ज्यावेळी आपल्याला जन्माला घातलेल आहे या जगात काहीतरी आपण निश्‍चितपणे काहीतरी करणार आहोत हाच हेतू त्या  परमेश्वराचा आहे  आणि काहीतरी देण्याची ही  वेळ आता   आलेली आहे आज अशी एकही व्यक्ती नाही *तिच्याकडे समय संपत्ती आणि बुद्धी* या तिघांपैकी  एक किंवा दोन अशी त्याची स्वतः मिळवलेली  मिळकत नाही. आणि त्यापैकी त्याची इच्छा असेल तर ती तो देऊ शकतो जर ती संधी त्याला मिळून त्याने दिली  नाही.

तर त्याच्यात आणि नदीच्या प्रवाहावर वाहणाऱ्या प्रेत या दोघात काहीच फरक नाही करण *त्या प्रेताला  स्वतःचं अस्तित्व नसतं पण सजीव माणसाला स्वतःचं अस्तित्व संवेदना असतात सहानुभूती असते सहिष्णुता असते आणि म्हणून त्याच्या भूमिकेवरच समाजातील त्याची  प्रतिमा  ठरत  असते* आणि त्याचा  हा पुरुषार्थ सिद्ध करण्याची  ही संधी त्याला आजच्या  जागतिक संकटातून मिळालेली आहे  त्या संधीच आपण प्रत्येक जण सोन करणार आहोत  अशी खात्री आहे म्हणून आज इथेच थांबतो.
( शब्दांकन- डाॅ. शाळिग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!