अन माळेगावच्या वरसुबाई विद्यालयात ढोल,ताशांचा नाद घुमला 
टाकवे बुद्रुक: आंदर मावळातील माळेगाव खुर्द येथील वरसुबाई माध्यमिक विद्यालयात अदिवासी भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांचे माध्यमातून शाळेत आता पर्यंत देणगी रूपाने भरपूर मदत झालेली आहे.

इनर व्हील क्लब ऑफ बाणेर हील्स, डिस्ट्रिक्ट 313 यांचे वतीने शाळेत लेझीम पथक साहीत्य आणि ढोल ताशा पथक साहीत्य तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहीत्य प्राप्त झाले. या साठी क्लब च्या आय पी पी बबिता कौशिक,सचिव पौर्णिमा गाजूल,खजीनदार रश्मी पास्तोर,,इ.सी.मेंबर हेतल हेमनानी यांचे हस्ते हे खेळाचे साहीत्य शाळेला प्रदान करण्यात आले.

यावेळी बबिता कौशिक यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ते बरोबर खेळात ही चांगले करीअर करता येते,शारीरीक क्षमता वाढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे.हार जित हा विषय महत्वाचा नसून खिलाडी वृत्ती अंगी बाळगणे फार महत्वाचे आहै.ढोल आमचा, गर्दी माळेगावची, चौक पण माळेगाव चा आणि आवाज फक्त आणि फक्त आमच्या वरसुबाई हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचा असे मत व्यक्त केले.

ढोल ताशा  आणि क्रिडासाहीत्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला  शाळेतील विद्यार्थी तृप्ती आलम हिने आपल्या भाषणात इनरवील क्लब च्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. या वेळी माजी सभापती शंकरराव सुपे, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब खंडागळे,संस्थेचे सचिव पोपटशेठ बाफना,राजूशेठ बेदमुथ्था,दशरथ दगडे,गबळू लांघी,अनिल पिंपरकर,केंद्र प्रमुख मधूकर गंभीरे,शितल दंडवते,शिवकांता गिते,आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेतील शिक्षक राजेंद्र भांड आणि शिक्षकेतर कर्मचारी तुषार पवार, सुनिल गायकवाड, अशोक सुपे, बाळासाहेब गायकवाड, रघूनाथ सातकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले तर सुत्र संचलन नामदेव गाभणे यांनी केले. आभार संतोष बारसकर यांनी मानले.

You missed

error: Content is protected !!