आढे येथे महाराष्ट्रातील पहिला गोदाम प्रकल्प पूर्ण
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उभारणी
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायत च्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २२ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या गोदामचे काम पूर्ण झालें असून रोजगार हमी योजनेअंतर्गत गोदाम उभारणीचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

पुणे जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार यांच्या विशेष पुढाकाराने आढे येथे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून महाराष्ट्र राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

ग्रामपंचायतच्या माध्यमातून गोदाम उभारणीचा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता.  त्यासाठी सुमारे १४ लाख ४७ हजार रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे २२ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

सुनिता ज्ञानेश्वर सुतार, सरपंच आढे म्हणाल्या “
ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे करण्यात आली असून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोदाम उभारणीचा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. हा प्रकल्प भविष्यात ग्रामपंचायतला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा प्रकल्प ठरू शकेल.

You missed

error: Content is protected !!