तळेगाव स्टेशन:
रूगणसेवेचे व्रत जोपासणाऱ्या परिचारिकांनी आरोग्यसेवेचा वसा जपून  विश्वासार्हता जोपासावी असे आवाहन
तळेगाव जनरल हॉस्पिटल   अ‍ॅण्ड   काॅन्व्हलसंट  होम  नियामक  मंडळाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले.
तळेगाव जनरल हॉस्पिटल   अ‍ॅण्ड   काॅन्व्हलसंट  होम
च्या भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिग च्या लॅम्प लाईटींग व  शपथविधी  सोहळ्यात खांडगे बोलत होते.

२२वा लॅम्प लाईटींग व  शपथविधी  सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी  तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होम  नियामक मंडळाचे   सभापती शैलेश शहा, विश्वस्त डाॅ. शाळिग्राम भंडारी ,विश्वस्त  हेमंत सरदेसाई , उपप्राचार्य  दत्तात्रय   कर्डिले  उपस्थित होते.   परिचारिकांना आज शपथ देण्यात आली. सर्व परिचारिका यांनी दीपप्रज्वलन करीत आरोग्य सेवेची शपथ घेतली. छोटेखानी समारंभात सेवेचा भाव व्यक्त करण्यात येत होता.

डाॅ. शाळिग्राम भंडारी  म्हणाले,” परिचारिका यांनी रूग्ण संवाद शैली विकसित केली पाहिजे. रूग्ण सेवे सारखे पुण्य नाही. प्रमुख पाहुणे दत्तात्रय कर्डिले यांनी या क्षेत्रातील विविध संधी यांची माहिती दिली. नर्सिग मध्ये देखील डाॅक्टरेट मिळवता येते,त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संधी आपल्या देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. सभापती शैलेश शहा यांनी मार्गदर्शन केले.

पालक प्रतिनिधी प्रविण लोंढे,प्रशिक्षणार्थी प्रफुल्ल लोंढे,दिव्या केदारी यांनी मनोगत व्यक्त केली. प्राचार्या मोनालिसा पारगे यांनी यांनी प्रास्ताविक केले. प्रतिक्षा बालगुडे व शुभांगी कदम यांनी सूत्रसंचालन केले. क्रिस्टना रणभिसे यांनी आभार मानले. स्नेहा आवळे यांनी  प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!