वडगाव मावळ:
पोल्ट्री व्यावसायिकांच्या हितासाठी त्यांची मजबूत संघटना असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले.

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची विशेष सभा संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री गोपाळे गुरूजी हे बोलत होते.यावेळी कार्याध्यक्ष सुभाष केदारी,सचिव प्रविण शिंदे,सहसचिव महेश कुडले,सचिन आवटे,बाबाजी पाठारे,शिवाजी कारके,सोपान चव्हाण,मल्हारी ढोरे, मयुर ढोरे, कानिफनाथ वाल्हेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गोपाळे गुरूजी म्हणाले की,काही पोल्ट्री व्यावसायिकांच्या  निष्काळजीपणा आणी किरकोळ  चुकामुळे पोल्ट्री कंपन्यांच्या कोर्ट -केसेसला सामोरे जाण्याची वेळ  आलेली आहे. मात्र संघटना ही पोल्ट्री  फार्मरच्या पाठीशी भक्कमपणे उभी  राहिल अशी ग्वाही गोपाळे गुरूजी यांनी यावेळी दिली. यावेळी संघटना  मजबूत करण्यासाठी सर्व पोल्ट्री फार्मरने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!