जयपुर फूट प्रदान कार्यक्रम
पिंपरी:
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांचे वतीने जयपुर फूट, हात, पोलिओ कॅलिपर्स व कुबड्या यांचे मोफत वाटप जयपुर फूटचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नियोजनानुसार करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम च्या वतीने कै. हसमुख मेहता यांनी१९९५ साळी सुरू केलेल्या जयपूर फूट वाटपाचा कार्यक्रम २८ व्या वर्षी चालूच आहे.

त्यासाठी सतत चार दिवस पुणे, भोसरी, चिंचवड व पिंपरी येथे सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोजमाप व नोंदणी नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नांदेड, लातूर, धुळे, जळगाव, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे,  पिंपरी चिंचवड  इत्यादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ३०४ अपंग व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला.

जयपुर फूट व इतर साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे प्रांतपाल राजेश कोठावडे तसेच वाय सी एम हॉस्पिटलच्या अनस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. मारुती गायकवाड, उपप्रांतपाल दोन सुनील चेकर, माजी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे व राजेंद्र काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ३२३४ डी २ मधील २५ क्लबचा तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी, इनरव्हील क्लब बाणेर,लायन्स क्लब ऑफ पुणे डाउनटाउन, इनरव्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियल तसेच दिलीप सोनीगरा ज्वेलर्स, चिंचवड यांचे मोलाचे आर्थिक सहाय्य लाभले.

दामाजी असबे, नेमीचंद बोरा, श्रीराम भालेराव, अनिल झोपे, प्रतिभा काळे, प्रथमेश काळे, उमा पाटील, मनीषा माने, सीमा पारेख निलेश पाटील, दिलीप काकडे, शैलजा सांगळे, तसेच मोरया  सेंटरच्या १२ विद्यार्थिनींनी  कार्यक्रम यशस्वीरीत्या पlर पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. दिलीप सिंग मोहिते, निरा आनंद, अंशुल शर्मा, जॉनी थडानी, ऋषिकेश देवरे, सलीम शिकलगार, प्रमोद चौधरी, सिद्धांत माने, दीपा प्रभू, गुरुप्रसाद कनोजिया इत्यादी उपस्थित होते.

राजेंद्र काळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रl, शैलजा सांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!