रुडसेट संस्थेचा रौप्यमहोत्सव विविध  कार्यक्रमाने संपन्न
तळेगाव दाभाडे:
बँकेचे व्यवहारात  पारदर्शकता ठेवली तर उद्योग व्यापार भरभराटीतस जातत असे प्रतिपादन कॅनरा बँक सर्कल ऑफिस पुणे याचे महाप्रबंधक  राजेश कुमार सिंग यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील रूडसेट,संस्था च्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रमांमध्ये बोलत होते. या कार्यक्रमास   मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कॅनरा बँक पुणे रिजनल ऑफिसचे रिजनल मॅनेजर राजीव कुमार सिंग, बँक ऑफ महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचे अग्रणी बँक मॅनेजर  श्रीकांत कारेगावकर, आरसेटी महाराष्ट्र राज्य डायरेक्टर,सुनील कस्तुरे, अशोक चव्हाण, उमेद अभियानाचे राज्य समन्वयक  विशाल जाधव, परीक्षा नियंत्रक प्रीती पांडे, संस्थेचे कार्यकारी संचालक गिरीधर कल्लापुर स्थानिक सल्लागार कमिटीचे अंबर साप्ताहिकाचे संपादक  सुरेश साखवळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, विश्वनाथ मराठे,  इंनर विल्ह क्लबच्या अध्यक्ष वैशाली दाभाडे, युवा उद्योजक आशिष खांडगे,संस्थेचे माजी संचालक वर्ग व मोठ्या प्रमाणावर यशस्वी उद्योजक उपस्थित होते.  

यावर्षी संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम संस्थेच्या वतीने व कॅनरा बँकेच्या सहकार्याने संस्थेच्या प्रशिक्षित महिला उद्योजकांचे विक्रीसाठी विविध प्रकारचे बाजार आयोजित केले होते. स्वयंरोजगाराची जागृती व्हावी या निमित्ताने तळेगाव शहरांमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  

  मुख्य कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन हे अनोख्या पद्धतीने म्हणजे पाहुण्यांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन करून करण्यात आले. संस्थेच्या वतीने कृतज्ञता म्हणून माझी संचालकांचा येथे सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव करण्यात आला त्यांनी लावलेले हे रोपटे आज खऱ्या अर्थाने वटवृक्षांमध्ये रूपांतरित झाले आहे हे या गोष्टीतून अधोरेखित झाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मार्गदर्शन करताना अशी संस्था मावळातील महिलांचे आर्थिक सबलीकरणाबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करण्यासाठी खूप मोठे योगदान देत असून या संस्थेला शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील व लवकरात लवकर संस्थेला स्वतःच्या जागेमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातील हे त्यांनी नमूद केले व संस्था करीत असलेले कार्याचा आढावा घेऊन संस्थेला नावाजण्यात आले.  

                     
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विद्यमान संचालक श्री प्रवीण बनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश निळकंठ यांनी केले व आभार प्रदर्शन हरीश बावचे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी संदीप पाटील, योगिता गरुड ,रवी घोजगे,बाळू अवघडे, लता टाकळकर यांनी केले . टेलरिंग प्रशिक्षणार्थी व माजी विद्यार्थी ब्युटी पार्लर प्रशिक्षणातील यांनी मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!