मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात संपन्न
तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्वप्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक विभागाचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात पार पडले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेने ‘७५ आजादी का अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे  बाबासाहेब सौदागर (प्रमुख कलाकार-मराठी इंडस्ट्री) याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे,
नंदकुमार शेलार,सोनबा  गोपाळे गुरुजी, अविनाश पाटील, आदित्य खांडगे, सत्यम खांडगे , प्रथमेश पाटील,अनुपमा खांडगे उपस्थित होते.

शाळेचे उपाध्यक्ष  अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्ष गणेश खांडगे यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुखपत्र ‘मॅक्स व्हॉईस'(सन २०२२-२३) याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.(सन २०२२-२३) ह्या शैक्षणिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

  उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पूर्वप्राथमिक विभागातून  जोया शेख ,प्राथमिक विभागातून वैष्णवी दाभाडे ,माध्यमिक विभागातून श्रावणी चोरमाळे या विद्यार्थ्यांचा  तसेच खेळातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून स्वयम तोरगल्ली ह्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय श्री.विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मरणार्थ प्राथमिक विभागातून कु.खुशी प्रजापती व माध्यमिक विभागातून कु. अनिष जामदार या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब सौदागर(प्रमुख कलाकार-मराठी इंडस्ट्री) यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले व शाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला.  शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून आपल्या देशाच्या जाज्व्ल्य इतिहासाची जाणीव करून दिली.

इ. ९वी १० वी च्या विद्यार्थ्यांनी ‘उरी’ येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राईक ह्या नाट्यमय नृत्यातून शहीदांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका विशिष्ट, सई पाटील, श्रावणी चोरमाले,कु.निशा केदार,आदित्य कृष्णा लगडे, संचित माने, श्रेया कुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!