शालेय विद्यार्थी हेच भावी पिढीचे भवितव्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पवना शिक्षण संकुलात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंच्याहस्ते वृक्षारोपन
पवनानगर :
शालेय विद्यार्थी हेच भावी पिढीचे भवितव्य आहे शाळेतुन संस्कारक्षम पिढी घडावी देशाचे नेतृत्व करण्याचे बाळकडू शिक्षणात  आहे तसेच पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत असे  मत  पवनानगर शालेय वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

जिवनात धनापेक्षा वन महत्वाचे आहे आरोग्याच्या दृष्टीने वन वृक्ष आपल्याला अनेक पटीने देत असतो उत्तम आरोग्यासाठी झाडे लावा झाडे जगवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले 
पवना संकुलात पवना असोसिएशनचे अध्यक्ष रजनीकांत श्राॅफ यांच्यावतीने विद्यार्थ्यांना स्वछतागृहासाठी ५०लाख रुपये निधी उपलब्ध केला असुन काम चालू केले आहे.

  मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले  की ग्रामीण भागात रस्ते,शिक्षण, आरोग्य यासाठी अधिक काम करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ग्रामीण भागात अनेक अडचणींवर मात करून विद्यार्थी शिक्षण घेत असतात या विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपले कर्तृत्व आहे.
मुनगंटीवार यांनी मला एक मंत्र दिला होता .

आमदारकीच्या तिकीटासाठी पक्षात असताना माझी त्यांची भेट झाली यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि ‘सुनील कोशिश करनवालो की हार नहीं होती’ मनापासून काम केले तर यश हमखास मिळते हाच मंत्र मला कामी आला मावळ  भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे म्हणाले पवना भागातील हजारो विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत.

याभागातील विद्यार्थ्यांना ॲग्रीकल्चर महाविद्यालयासाठी जलसिंचन विभागाची जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुनगंटीवार यांच्याकडे केली.
यावेळी पद्मभूषण  पुरस्कार्थी रजनीकांत श्राॅफ,स्नेड्रा श्राॅफ,सुमीत चौक्सी,जुजर खुराकीवाला,प्रदिप सागर,शिल्पा सागर,पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,वनविभगाचे वरिष्ठ अधिकारी राहुल पाटील,सुनिल भोंगाडे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे ,नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, पर्यवेक्षिका निला केसकर,अलका धानिवले, कल्याणी ठाकर, यळसेच्या सरपंच सीमा ठाकर, पवनानगर उपसरपंच आशा कालेकर, छायाताई कालेकर, सुवर्णा राऊत, अनंता वर्वे, बाळासाहेब मसूरकर, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर फुलाबाई कालेकर,संजय मोहोळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक नू म वि प्र मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी तर सुत्रसंचालन रोशनी मराडे,सुवर्णा काळडोके, भारत काळे यांनी तर आभार संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी मानले.

error: Content is protected !!