वडगाव मावळ:
मिंडेवाडी (ठाकरवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्या व नूतन अंगणवाडीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले.या कामांसाठी एमआयडीसीकडून सहा गुंठे जागा व निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धनचे सभापती  बाबुराव वायकर यांच्या पाठपुराव्याने हे काम पूर्ण झाले.नवीन वर्ग खोल्या बांधल्याने कातकरी,ठाकर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी सभापती बाबुराव वायकर, सरपंच सविता बधाले, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, नवनाथ पडवळ, चेअरमन तानाजी  जाधव, कामशेतचे सरपंच रुपेश गायकवाड, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे,ग्रामपंचायत सदस्या विजया शेटे, उषा दरेकर, अलका बधाले, नवनाथ पडवळ, भगवान बधाले, बाळु बधाले, दत्तात्रय बधाले, मुख्याध्यापक नयना गवळी, केंद्रप्रमुख मिनीनाथ खुरसुले  उपस्थित होते. किसन सातपुते सर यांनी सुत्रसंचालन केले.

आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामाला प्राधान्य देताना कामाचा दर्जाही चांगला राखला पाहिजे असे आवाहन करून आमदार सुनिल शेळके म्हणाले,”सार्वजनिक विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला घडविण्यासाठी शिक्षकांनी कृतिशील उपक्रमांवर भर दिला पाहिजे.

error: Content is protected !!