कार्ला:
येथे पद्मश्री डॉ.बालाजी तांबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बालाजी तांबे फाउंडेशनच्या वतीने  येथील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन आणि स्व.गीता एन.सैनानी, कै.शांताबाई हरिभाऊ वायकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत पाणपोईचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

आमदार सुनिल शेळके ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी
आत्मसंतुलन व्हिलेजचे एमडी सुनील तांबे, डायरेक्टर डॉ.मालविका तांबे, मा.पं.स.सदस्य  दिपक हुलावळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, कार्ला सरपंच दिपाली हुलावळे, माजी जि.प.सदस्य  भरत भाई मोरे, उपसरपंच  किरण हुलावळे, सदाशिव सप्रे, सोनबा गोपाळे गुरुजी, विलास बडेकर, बाळासाहेब भानुसघरे, गणपत भानुसघरे, सुहास गरुड, संजय बावीस्कर, सुनील वाळुंज, संजय जाधव, प्रवीण तिकोणे, प्राचार्य श्री.कैलास पारधी, कैलास हुलावळे, सदस्य.उज्वला गायकवाड भारती मोरे, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, अभिषेक जाधव, सनी हुलावळे, सचिन हुलावळे उपस्थित होते.

error: Content is protected !!