ठाणे:
भिवंडी तालुक्यातील खंबाळा गावातील लेक  ठाणे जिल्ह्यातील पहिली भूमिपुत्र न्यायाधीश झाली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.मुली प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. स्त्री शक्तीच्या कर्तबगारीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ॲड. रुणाली रंजना दयानंद पवार असे या लेकीचे नाव.पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात ८ वा क्रमांक पटकावला.त्यांची  दिवाणी न्यायाधीश (जज) पदावर नियुक्त झाली.

रुणालीचे वडील श्री. दयानंद पांडुरंग पवार व आई सौ. रंजना दयानंद पवार हे भिवंडी तालुक्यातील खंबाळा गावात किराणा दुकान चालवतात. आपलं शिक्षण कमी असले तरी मुलांना चांगले शिक्षण देण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणूनच त्यांनी रुणालीला आजोबा श्री.महादेव कराळे व श्री.रामचंद्र पष्टे यांच्या घरी राहायला पाठवले.

रुणालीचे १०वी पर्यंतचे शालेय शिक्षण कल्याण येथे मोहिंदर सिंग इंग्लिश हायस्कुलमध्ये  व १२ पर्यंतचे शिक्षण बिर्ला काॅलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने आपले L.L.B वकिली मुंबई येथिल गव्हर्नमेंट लाॅ काॅलेजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पूर्ण केले. उच्च शिक्षण तिने पुणे येथे हॉस्टेलवर राहून पूर्ण केले. ह्या शैक्षणिक प्रवासात तिल तिच्या आई- वडील, आजी-आजोबा,मावशी व मामा-मामी, भाऊ-बहिणी व मित्रपरिवाराची मोलाची साथ मिळाली.

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून तिने मेहनत घेतली व महाराष्ट्र राज्यात 8 व्या क्रमांक पटकावून यश मिळवले.रुणालीने मिळवलेल्या यशामुळे पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुली व विद्यार्थ्यांसाठी रुणालीचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

You missed

error: Content is protected !!