नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे  ‘परीक्षे पे चर्चा २०२३’ सत्र संपन्न
   तळेगाव स्टेशन:
   तलकटोरा इंदौर स्टेडिअम, नवी  दिल्ली येथून  ‘ परीक्षे पे चर्चा २०२३’ या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी  देशातील लाखो विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी, आकाशवाणी तसेच काही सामाजिक माध्यमांद्वारे दाखविण्यात आले. त्या अनुषंगाने नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी या सत्राचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमास तीनशेहून आधी विद्यार्थी उपस्थित होते.
  
              परीक्षेदरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे सामोरे जावे, अभ्यासाची सुरवात कशाप्रकारे केले पाहिजे या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे  विविध उदाहरणांच्या  माध्यमातून  पंतप्रधान  मोदींनी अतिशय सोप्या शब्दात सर्वांना सांगितली. या सत्रात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पंतप्रधान मोदी यांना परीक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तरही तितकेच समर्पक मार्मिक सर्वांना मिळाले.
             
          याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री. संजय ( बाळा) भेगडे, परीक्षा विभाग प्रमुख, प्रा. प्रकाश क्षीरसागर, डॉ. आनंद दौलताबाद  शिक्षक  आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग  आदी मान्यवर  उपस्थित होते.

error: Content is protected !!