इंदोरी:
येथील  चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE ) येथे आंतरशालेय कबडडी स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. मुलांन मधील सुप्त गुणानां वाव दयावा त्यांच्या मध्ये खेळाडू वृत्ती वाढावी , खेळामधून एक आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण व्हावे आणि खेळासाठी मैत्री व मैत्री साठी खेळ ही  भावना वृद्धींगत होण्याच्या उदेशाने कबडडी स्पर्धाचे आयोजन केले होते.

   मावळ तालुक्यातील  एकूण २७ संघानी यात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील क्रीडा शिक्षक कु  प्रियांका मोरे व  श्री. वेद प्रकाश पटेल यांनी केले.  क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा. डॉ. श्री.  शरद बाबुराव  पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आलेल्या सर्व अतिथी, शिक्षक व पंच यांचे स्वागत शाळेच्या मुख्याद्यापिका मा. श्रीमती. हेमलता खेडकर यांनी पुष्प देऊन केले.
  
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर म्हणाले,” ही संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी , छत्रपती शिवाजी महाराज   व  मावळे  यांच्या रणरांगड्या युद्ध नीतीतून तयार झालेले संस्कार  अशा  सुंदर संगमात  असलेल्या भूमीत स्थापन झालेल्या या विद्यालयात आज आपण या स्पर्धा घेत आहोत याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मुलांन मध्ये मैत्रीची भावना जोपासावी व मानसिक व शाररीक विकास व्हावा ह्या दृष्टीने प्रत्येक  शाळेत अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

  पंतप्रधान यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन फिट इंडिया –खेलो इंडिया या प्रेरणेने आपण या स्पर्धांचे आयोजन केले आहे. संयम ,शिस्त व मैत्री याचा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळेल अशी  खात्री मला आहे असा विश्वास त्यानी व्यक्त केला व  सर्वाना खेळासाठी शुभेच्या दिल्या. या   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दिमदिमे  व विना यादव यांनी केले,  तसेच वेळ अधिकारी  सायली कडू व सौ प्रियांका जांभूळकर ह्या होत्या. गुण अधिकारी ही जबाबदारी माधुरी उंबरकर व सरोजिनी आलडी यांनी पर पडली. फोटोग्राफी व व्हिडीओ रेकॉर्डिंग  नागमनी गुनती यांनी केले.
 
प्रथमोपचार कक्ष‍ची  जबाबदारी  श्वेता काळे व गौरी कदम यांनी पार पाडली.  पारितोषिक वितरण व प्रमाणपत्र लिखाण  यांस श्वेता उडपी व प्रतीक्षा चाफेकर या  जबाबदार होत्या.  उपस्थित सर्व शिक्षक ,पंच विध्यार्थी यांच्या नाश्ता, जेवण , खाऊ वाटप  याची पूर्ण जबाबदारी पूनम शेवकर यांच्याकडे होती , स्वागत कक्ष‍ची  जबाबदारी प्रज्ञा शिंदे यांनी पार पडली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विदयार्थी व पालक  यांनी सर्व कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. आयोजित केलेल्या या स्पर्धा मध्ये खालील संघांनी विजेते पदक पटकावले .

१४  वर्षाखालील मुलींच्या गटात –  आंतरभारती बालग्राम पहिली, परिजन आश्रम विद्यालय दुसरी ,चैतन्य इंटरनॅशनल स्कूल तिसरी
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात – सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल पहिली, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल दुसरी ,परिजन आश्रम विद्यालय तिसरी

१७  वर्षाखालील मुलींच्या गटात – श्री शिवाजी विद्यालय पहिलं ,. सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल दुसरे, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल तिसरा
१७  वर्षाखालील मुलांच्या गटात  – श्री शिवाजी विद्यालय पहिलं ,सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल दुसरं ,परिजन आश्रम विद्यालय तिसरा  क्रमांक. सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

You missed

error: Content is protected !!