सांगिसे येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व  हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन
कामशेत:
    सांगिसे ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
      यावेळी श्री अंबादास गर्जे यांनी मनोगत व्यक्त करून महात्मा गांधी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या स्वांतत्र्यवीरांच्या कार्याविषयी माहिती दिली.
     
   कार्यक्रमाचे संयोजन प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सुत्रसंचलन ज्ञानेश्वर अरनाळे यांनी तर आभार सविता शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ ढोरे,अमोल आल्हाट यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!