टाकवे बुद्रुक:
  लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी च्या वतीने घोणशेत येथील भैरवनाथ विद्यालयात सायकल वाटप करण्यात आल्या.कचरेवाडी,देशमुखवाडी,घोणशेत येथून पायपीट करीत शाळेत येणा-या सावित्रीच्या लेकींची त्यामुळे पायपीट थांबणार आहे.
 
विद्यालयाच्या प्रांगणात सायकल वाटप करण्यात आले.यावेळी लl. राजेश कोठIवडे – डिस्ट्रिक्ट गव्हर्नर,बाळकृष्ण जोशी – माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर,अनिल झोपे – रिजन चेअरमन,अंशुल शर्मा- झोन चेअरमन,निलेश पाटील – अध्यक्ष,शैलजा सांगळे – डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन युथ आऊटरीच समिती ,प्रमोद चौधरी – खजिनदार,राजेंद्र काळे,शामकुमार माने,दिलिप काकडे,सुवर्णा तापकीर,श्वेता गोस्वामी,विशाल गोस्वामी, असित सिन्हा यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले,उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे,संचालक प्रल्हाद जांभूळकर,संचालक दत्तात्रय असवले,राज खांडभोर,चेअरमन दामूशेठ खरमारे, कदम दादा मुख्याध्यापक पवार सर,उभे सर उपस्थित होते.

मागील पाच वर्षापासून या  क्लबच्या वतीने मावळ तालुक्यात सायकल डोनेशन केल्या जात आहे. सायकल बॅक सुरू करून विद्यार्थीथ्यांची पायपीट थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील पाच वर्षांत अनुक्रमे न्यू इंग्लिश विद्यालय, चांदखेड,उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय , सांगिसे
जिल्हा परिषद शाळा, कान्हेवIडी,जिल्हा परिषद शाळा, भाजे आणि भैरवनाथ माध्यमिक विद्यालय घोणशेत या शाळेत सायकल वाटप करण्यात आले. मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनचे संपादक रामदास वाडेकर यांनी साठी पुढाकार घेतला. श्री. पवार एन. डी. ( मुख्याध्यापक ) कडूसकर एस . बी. , श्रीम. शेरे एस. आर., चोरघे के. एस. असवले आर. टी. , असवले के. एन. यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!