पिंपरी:
लायन्स क्लब मार्फत कृत्रिम पायरोपण व स्वयंचलित हात यांचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लायन्स इंटरनॅशनल ३२३४ डी-2 यांच्या विद्यमाने दि. ३० जानेवारी ते दि. ३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कृत्रिम पायरोपण जयपूर फूट व स्वयंचलित हात यांचे मोफत वाटप करण्याचे शिबीर आयोजित करणेत आले आहे.

हे शिबीर पुणे शहराबरोबरच पिंपरी- चिंचवड मधील भोसरी निगडी – चिंचवड येथे ठेवण्यात येणार आहे. ३० जानेवारी, २०२३ ते २ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबीर घेतले जाणार आहे.

गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या लोकांचे विविध कारणांनी आणि अपघातात पाय गमावले आहेत. ज्या व्यक्तीचे कारखान्यात अथवा शेतात काम करताना कोपऱ्यापासून हात गमावले आहेत त्यांना सेन्सर सह मशीन ऑपरेटेड कृत्रिम हात पुरवण्यात येणार आहेत. शिबिरात येणाऱ्या व्यक्तींच्या पायाचे आणि हाताचे माप अगोदर यावे,ज्यांनी माप दिले आहे त्यांना हे साहित्य दिले जाणार आहे.

दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रांतपाल लायन राजेश कोठावदे यांच्या उपस्थिती जयपूर फूट व कृत्रिम हात हे गरजू लोकांना वाय. सी. एम. हॉस्पिटल, वल्लभ नगर पिंपरी येथे वितरित करण्यात येणार आहेत.गरजू लोकांबरोबरच सर्व सेवाभावी संस्था यांनी गरीब लोकाशी संपर्क करून त्यांना या शिविरात सहभागी करून घेण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी खालील लायन सभासदांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

चेकअप व मोजमाप करण्यासाठी हॅप्पी जॉइंट क्लिनिक, ऑफिस नं ४०२ ४या मजला, मॅजेस्टी के सिटी वीव्ह बिल्डींग, अप्सरा थेटर समोर कुमार एसीफिक जवळ, सेवन सब चौक, गुलटेकडी, पुणे  वाय. सी. एम. हॉस्पिटल, नेहरू नगर, पिंपरी, पुणे साईनाथ हॉस्पिटल, संतनगर, पुणे- नाशिक रोड, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड, मोशी, पुणे, मोरया हॉस्पिटल चाफेकर चौक, पी.एम.पी.ल. बस स्टॉप समीर, चिंचवड, पुणे
वेन्द्रात हॉस्पिटल, जी-ब्लॉक चिंचवड एम आय डी. सी. रोटरी क्लब समोर, परमेंक्स पीक संभाजी नगर, चिंचवड पुणे येथे मोजमाप देता येईल.
अधिक माहितीसाठी ९८५०९७७७९५,१९८२२३७१३९९,१५४११६५७८६ संपर्क साधावा.

error: Content is protected !!