बालकांसाठी मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
वडगाव मावळ:
लहानपणीच वेळेवर लवकर निदान लवकर उपचार  या सूत्रीमुळे सक्षम पिढी तयार होण्यास मदत होत.आहे. मावळ तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यासाठी करीत असलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी  ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ अधिनस्त राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. यात चार पथक आहे.  या अंतर्गत अंगणवाडी व शाळेची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

बालकांची  या संदर्भात २०१३ ते अद्यापपर्यंत  हृदय शस्त्रक्रिया ५७,अपेंडिक्स शस्त्रक्रिया -५४ ,दुभंगलेले टाळू शस्त्रक्रिया-२८,कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया -३१,सिस्ट शस्त्रक्रिया-२४,तिरळेपणा शस्त्रक्रिया-३२
,टंगटाय शस्त्रक्रिया-३७,टॉन्सिल शस्त्रक्रिया-१६,हर्निया शस्त्रक्रिया-४१,फायमोसिस शस्त्रक्रिया-४६,ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया-२६,कॉक्लीअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे.

ती कुपोषित बालकांवर उपचार-६१०(सॅम=१५७ मॅम=४५३) उपचार झाले आहे.
या वर्षातील संदर्भित बालकांसाठी  संदर्भसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात १९३ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे व वैशाली दाभाडे अध्यक्षा इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी केले.या  शिबिरातील लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे ,ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ ,उपजिल्हा रुग्णालय लोणावळा येथील तज्ञ डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले.

शिबिरात  बालरोगतपासणी ,कान नाक घसा तपासणी ,दंत रोग तपासणी ,नेत्र तपासणी ,आहार सल्ला व समुपदेशन ,प्रयोगशालीन परीक्षण ,औषधी वाटप इत्यादी सेवा मोफत देण्यात आल्या आहेत.  शिबिर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शशांक धंगेकर यांनी केले. याप्रसंगी मा. डॉ.दर्पण महेशगौरी वैद्यकीय अधिक्षक मायमर मेडिकल कॉलेज तसेच
ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ येथील  सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेआभारप्रदर्शन डॉ.पद्मवीर थोरात यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनीषा गावंडे यांनी केले.

error: Content is protected !!