टाकवे बुद्रुक:
येथे माजी उपसरपंच रोहिदास नाना असवले भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे  हीलींग हँड्स फाउंडेशन आणि माजी  उपसरपंच रोहिदास नाना असवले  फाउंडेशन व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विध्यमाने मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया,भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकारावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

हिलींग हँडस फाउंडेशन डॉ. निजाम शेख यांनी पेशंट तपासणी केली तर तेजश्री खलाटे, मधुरा भाटे यांनी आहार कसा असावा यावर मार्गदर्शन केले,आणि औषध वाटप केले आनंद मिसाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबीर सकाळी 11 ते 2 या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 50 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले.

अनिता सैद यांनी शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक शिबिराचे पूर्ण नियोजन केले.या आजाराविषयी  योग्य माहिती व मार्गदर्शन गावोगावी पोहोचवण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल व सेक्रेटरी हींलिंग हॅन्डस
फाउंडेशन डॉ. स्नेहल पोरवाल यांचा प्रयत्न आहे.

शिबीराचे  उद्घाटन  मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रोहिदास असवले, भाजप जेष्ठ कार्यकर्ते तुकाराम कोद्रे,बाळासाहेब घाडगे, बबन ओव्हाळ, टाकवे भाजप अध्यक्ष दत्ता असवले, माजी  ग्रामपंचायत सदस्य गोरख मालपोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अतिश मोरे,साहेबराव  आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, विश्वनाथ असवले, बजरंग इंगळे काशिनाथ जांभुळकर, संजय जगताप  ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पारिठे, हनुमंत लोंढे, बाळासाहेब पारीठे, उमाकांत मदगे, बाळासाहेब करवंदे, रोहिदास जांभुळकर, पत्रकार संकेत जगताप, संतोष कोंडे, सोमनाथ भ. असवले, शंकर असवले, विनायक सावंत,मुन्नावर आत्तार, संभाजी मालपोटे, विलास लोंढे,भगवान मालपोटे,पराग सावंत, समीर उर्फ दादा  असवले ,सोमनाथ सा. असवले  उपस्थित होते.

error: Content is protected !!