पवनानगर :
कोथुर्णे गोडूबाई वस्ती येथील आदिवासी वस्तीवर मकर संक्रांत साजरी करण्यात आली यावेळी सर्व आदिवासी महिलांना साडी भेट देण्यात आल्या.

मावळ शिक्षण प्रतिष्ठाणच्या वतीने  अदिवाशी महिलां समवेत मकर संक्रांतीचे औचित्य साधून आदिवासी महिलांना प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सभापती  ज्ञानेश्वरजी दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साड्या वाटप करण्यात आल्या व तिळगुळ वाटप करुन सण साजरा करण्यात आला .

महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मानसन्मान देण्याची पद्धत रुढी परंपरा सुरू झाल्या त्यामुळे प्रत्येकांशी प्रेम स्नेह व आपुलकीचे नाते निर्माण व्हावे या हेतूने या आदिवासी महिलांना सामाजिक बांधिलकी जोपासत मकर संक्रात या सणाच्या निमित्ताने आदिवासी महिलांना सामाजिक प्रवाहामध्ये आणून त्यांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे त्यामुळे आदिवासी महिलांना वाणाच्या स्वरूपात साडीचे वाटप करण्यात आले व तिळगुळ देण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मावळ शिक्षण प्रतिष्ठाणच्या प्रकल्प समन्वयक मीनाक्षी तिकोणे व गीते ताई यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी माजी सरपंच शकुंतला वाघमारे, ऋतुजा निंबळे व उमा सपकाळ आदी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!