वडगाव मावळ:
  १७५ वर्षापुर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी  महीलासाठी पहिली  शाळा सुरु करुन स्त्रियांना प्रकाशाच्या वाटा दाखवल्या सावित्रीबाई यांच्या या कार्यामुळे अनेक महीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे . राजकीय क्षेत्रात ही महीला मागे राहील्या नाही अशा या फुले दांपत्याचे स्मारक भिडे वाड्यात  व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहे परंतु ते होण्यासाठी भिडे प्रवुत्तीच्या विरोधात संघर्ष करावा लागत आहे असे प्रतिपादन राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले
 
    चाकणकर यांनी महिलांना मार्गदर्शन करत असताना वटपौर्णिमा, वंशाचा दिवा, विधवा महिलांचे हिरावून घेतलेले हक्क, मासिक पाळीतून होणारा त्रास व सत्यवानाची सावित्री अशा महिलांच्या विवध विषयांवर प्रखरतेने भाष्य केले. 
      मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळ व नाणोली येथील श्री संत सावता माळी महाराज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उस्तवानिमित्त कार्यक्रमात चाकणकर बोलत होत्या.
     
   यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ दत्तात्रय बाळसराफ, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव,माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुदेश गिरमे, चांदखेडच्या  सरपंच मीना माळी,  इंदोरीच्या उपसरपंच लतिका शेवकर, माजी उपसरपंच लीलाबाई शेवकर , समता परिषदेच्या महीलाध्यक्षा  वंदना जाधव, रामचंद्र जगताप,  एकनाथ भुजबळ , दिलीप शिंदे, सचिन जाधव ,  माजी सरपंच विनायक भुजबळ, आदी उपस्थित होते.
  
   जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तसेच महापुरुषांच्या प्रतिमेची शोभा यात्रा काढण्यात आली, सायंकाळी व्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान झाले मान्यवरांच्या उपस्थितीत संपर्क बालग्रामच्या संस्थापिका सौ रत्ना अमित बॅनर्जी यांचा आदर्श माता पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कु हर्षदा गरुड, आरती  म्हाळस्कर, सोनल खांदवे, फाल्गुनी जाधव, तृप्ती निबंळे यांचा तसेच समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, सरपंच , उपसरपंच, सदस्य यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
  
  महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते सुत्रसंचालन  लक्ष्मण शेलार यांनी केले तर  , प्रास्ताविक स्नेहल बाळसराफ यांनी केले आभार रामचंद्र जगताप यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळ यांनी केले

वडगावच्या प्रशासकीय इमारतीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारणार – सुनिल शेळके
    मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी माळी समाजोन्नती मंडळ अतिशय चांगले काम करीत आहे नाणोली येथे श्री संत सावता माळी महाराज मंदिरासाठी ३५ लाख.रुपयांचा निधी  देवु असे आश्वासन दिले तर वडगाव येथे नव्याने होत असलेल्या प्रशासकीय इमारतीत महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!