मावळ तालुका माळी समाजाच्या मेळाव्याला दिग्गजांची उपस्थिती नाणोलीत
वडगाव मावळ:
   मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे  शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी माळी समाजोन्नती मंडळ, मावळ तालुका व श्री. संत सावतामाळी मित्र मंडळ नाणोली. यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले .
  
या निमित्त समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले असुन प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहे.शिरूर मतदार संघांचे खासदार, डॉ. अमोल कोल्हे,  मा. आमदार योगेश टिळेकर, आमदार श्री. सुनील शेळके , मा. राजमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे  उपस्थित राहणार आहे.

     महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक गावात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवनकार्य यावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते  निलेश जगताप यांचे व्याख्यान होणार आहे .त्यानंतर  मावळ तालुका आदर्श माता पुरस्कार रत्ना कुमार बॅनर्जी (बालग्राम अनाथाश्रम मळवली) ,  सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा यात मावळ तालुक्यातील गुणसंपन्न विध्यार्थी – विध्यार्थिनी यांना देखील सन्मानित करणार आहे .
    
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते महिलांसाठी लकी ड्राॅ,  बक्षीस वितरण व मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,ग्रा प सदस्य नगरसेवक यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.तालुक्यातील समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!