आई वाघेश्वरी देवी उत्सावातील कुस्ती आखाड्यात नितिन कोळेकर ठरला पाटणश्री 
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
लोणावळा:
पाटण मावळ येथील श्री वाघेश्वरीदेवीच्या उत्सवानिमित्त कुस्तीशौकिनांसाठी भव्य मैदानी कुस्त्यांच्या आखाडा घेण्यात आला होता.यामध्ये हनुमान आखाड्याचा पै.नितिन कोळेकर याने मामासाहेब मोहोळ या तालमीच्या पै. रोहित चव्हाणला पराभूत करत मानाची पहिली कुस्ती पाटण श्री मिळवत सर्वांची मने जिंकली .

पाटण मावळ येथे वाघेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्त तीन दिवस  विविध कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये पहिल्या दिवशी दि. (११ जानेवारी )आई वाघेश्वरी देवीच्या विधिवत अभिषेकाने सुरूवात झाली त्यानंतर सायंकाळी  गावामध्ये भजन व ढोल ताशांच्या गजरात देवीच्या पालखी छबीन्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल भंडार्‍याची उधळण व संपूर्ण गावात काढलेल्या रांगोळ्यांनी पालखीला वेगळीच रंगत आली.

पुणे येथील श्री छत्रपती शिवाजीराजे मर्दानी आखाड्याने केलेली शिवकालीन धाडसी प्रात्यक्षिके या पालखीचे मुख्य आकर्षण होते. . दुसऱ्या दिवशी (१२जानेवारी) रात्री मनोरंजनासाठी कल्हाट येथील तासुबाई कला नाट्य मंडळाचा भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते
  तर शेवटच्या तिसऱ्या दिवशी (१३ जानेवारी)भव्य निकाली कुस्ती  आखाडा(दंगल) घेण्यात आला या   कुस्ती  मैदानात  एकून  १९  कुस्त्या व शेवटी  दोन मानाच्या कुस्त्या घेण्यात आल्या.
 
हलगीच्या तालावर पैलवानांनी थोपटलेल्या दंडांच्या आवाजाने वातावरणाला रंगत आणली होती. अनेक नामांकीत मल्लांनी या मैदानात आपले कौशल्य दाखवले
  मानाची पहिली पाटण श्री कुस्तीसाठी  पाटण सरपंच प्रविण संभाजी तिकोणे यांंच्याकडून रोख रक्कम  ५१००० रु व  पाटण  गावच्या वतिने  भव्य  चांदीची गदा भेट देण्यात आली तर दुसरा नंबरच्या कुस्ती साठी  पांडुरंग  कोंडभर यांच्यावतिने ३१००० रुपये बक्षीस देण्यात आले.
 
मानाच्या पाटण ‘श्री’ कुस्तीचा मानकरी हनुमान आखाड्याचा  पै नितिन कोळेकर ठरला. कुस्ती समालोचक म्हणून राहुल चौधरी व संदिप राजाराम तिकोणे,संतोष तिकोणे यांनी केले.
     आई वाघेश्वरीदेवीच्या उत्सावाचे आयोजन उत्सव कमिटीचे सोपान गायकवाड,रमेश पटेकर ,गजानन तिकोणे,बाळु तिकोणे,धोंडु सुतार, शंकर तिकोणे,उमेश तिकोणे,संतोष तिकोणे,दत्ता तिकोणे,उल्हास मांडेकर,संतोष येवले,संदिप तिकोणे,तुकाराम तिकोणे,गणेश तिकोणे,नितिन तिकोणे,सोमनाथ तिकोणे,श्रीकांत तिकोणे,वैभव तिकोणे व  श्री स्वामी विवेकानंद तरुण मंडळ,वाघेश्वरी महिला मंडळ,श्री स्वामी विवेकानंद भजनी  मंडळ, समस्त ग्रामस्थ पाटण यांच्यावतिने करण्यात आले होते.

error: Content is protected !!