वडगाव मावळ:
आदिवासी विचारमंच महाराष्ट्र बिरसा ब्रिगेड मावळच्या वतीने आदिवासी क्रांतिकारक  आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि धरतीअाबा भगवान बिरसा मुंडा यांचा संयुक्त जयंती उत्सव  कुसवली याठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
              या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अकोले जि.अहमदनगरचे कार्य सम्राट आमदार डॉ.किरण लहामटे उपस्थित होते.आदिवासी क्रांतिकारकांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून करण्यात  आली.क्रांतिकारकांच्या पेहेरावात अनेक छोट्या मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे  आदिवासी क्रांतिकारकांच्या      प्रतीमांचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आला.
              कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदि.महादेव विरनक सरांनी करून सह्याद्रीच्या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास आणि आदिवासी संस्कृती ,परंपरा ,आदिवासी चळवळीची भूमिका मांडली .यावेळी आदिवासी महिलांनी पारंपरिक भलरगीत ढोलाच्या तालावर नाचत सादर करून पाहुण्यांची मने जिंकली.यावेळी बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुका मातृ शक्ती प्रमुख आदि.सौ.उमाताई मते यांनी आपल्या तडफदार शैलीत आदिवासी महिला सद्यस्थिती ,महिलांचे सक्षमीकरण ,आदिवासी महिला क्रांतिकारकांचे समाज उभारणीत आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबद्दल आपली परखड मते मांडली.
              कार्यक्रमात आदिवासी समाजातील विशेष कार्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या सहायक विक्रीकर निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या सागर किसन तळपे  , बिरसा ब्रिगेडच्या सरपंच सौ.साधनाताई काठे,आदिवासी नवकवियत्री रोशनी ताई मराडे,ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणीत गोल्ड मेडल मिळवलेल्या दर्शन आणि वैष्णवी धनंजय मोरमारे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजाचे वास्तव , संविधानिक अधिकार ,आदिवासी संस्कृती जपण्याची गरज भविष्यातील आव्हाने अशा अनेक विषयांना स्पर्श करून आपल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
              यावेळी आदिवासी गायक संदीप कोकाटे यांनी आदिवासी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.कवियत्री रोशनी ताई मराडे यांनी निसर्ग कविता सादर केल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष आदिवासींची बुलंद तोफ आदि.प्रवीण पारधी सर यांनी आदिवासींच्या जल.जंगल.जमिनीच्या लढ्यावर दृष्टीक्षेप टाकला.आदिवासी चळवळीचे महत्व आणि आदिवासी विचारमंच ने मांडलेली आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे ही भूमिका आज देश पातळीवर पोहचली आहे.हे चळवळीचे आणि आदिवासींच्या लढ्याचे यश आहे असे प्रतिपादन केले.
  या कार्यक्रमप्रसंगी मा.राहुल बुरुड साहेब (अधिकारी भारत सरकार) खेड तालुका बिरसा ब्रिगेड अड्यक्ष एकनाथ तळपे साहेब,आंबेगाव तालुका बिरसा ब्रिगेड अध्यक्ष आनंद मोहरे सर,मार्गदर्शक लक्ष्मण मदगे सर सोमनाथ मुऱ्हे सर ,रुपलीताई सुपे,मावळ तालुका बिरसा ब्रिगेड अध्यक्ष नागुजी ढोंगे,मावळ तालुका राष्ट्रवादी आदिवासी सेलचे अध्यक्ष किरण नाना हेमाडे, भांगरे मॅडम ,आदर्श सरपंच वडेश्र्वर गुलाब गभाले,पुणे जिल्हा नियोजन समितीचे श्री.संतोष भेगडे ,स्वयंभू फाऊंडेशनचे दत्ता अण्णा पडवळ ,दिपाली ताई गराडे,मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पत्नी सरिकाताई शेळके , नगर सेविका सुलोचना ताई शेळके ,अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसवली गावच्या सरपंच चंद्रभागा दाते ताई होत्या.
  त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी समाजासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बगाड यांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कुसवली ग्रामस्थ आणि मान्यवर,सत्कारमूर्ती सर्वांचे आभार प्रदर्शन उपसरपंच कैलास करवंदे यांनी केले.

error: Content is protected !!