कामशेत :
केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशनाद्वारे सक्षमीकरणाची मोहीम” अंतर्गत खडकळा (कामशेत) गावामध्ये कॅनरा बँकच्या वतीने आर्थिक समावेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
बँकेच्या सी एस आर फंडातून मावळ तालुक्यातील पवना विद्या मंदिर पवनानगर, छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली,अनाथ आश्रमा शाळा कामशेत येथिल १८  आर्थिक घटकातील मुलींना आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे श्री  बी पार्श्वनाथ, (उपमहाव्यवस्थापक प्रधान कार्यालय, बेंगलोर )यांनी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.व कार्यक्रमाची पहाणी केली या वेळी राजीवजी सिन्हा,( सहाय्यक महाव्यवस्थापक कॅनरा बँक पुणे, पुणे .) श्री अरुण कुमार सिंह, (मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक तळेगाव दाभाडे,)  उपस्थित होते.
खडकाळे गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष सहकार्य केले.या शिबिरास ग्रामस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला तसेच कॅनरा बँकेचे ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी सरपंच रूपेश गायकवाड ,उपसरपंच विमल पडवकर , मा. उपसरपंच शिल्पा दौंडे ,बळीराम शिंदे, युवराज शिंदे, ज्ञानेश्वर आडकर, मुकुंद ठाकर ,ज्ञानेश्वर ठाकर,नवनाथ ठाकर ,चंद्रकांत कालेकर ,अनिल ठाकर, अमित आडकर, मीनाक्षी शिंदे ,नंदिनी शिंदे ,उज्वला शिंदे ,कांचन शिंदे उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!