कामशेत:
येथील महावीर हॉस्पिटलमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांवर सवलतीच्या दारात उपचार करण्यात येणार आहे. याशिवाय उच्च रक्तदाब ,लिव्हर याही आजारावर उपचार करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या आजाराच्या व्याधीसाठी वडगाव,तळेगाव,पुणे शहरासह उपनगरात जाण्याची आवश्यकता नाही .या सर्व प्रकारच्या तपासण्या आणि त्यावरील उपचार कामशेत रेल्वे स्टेशन जवळील महावीर हॉस्पिटल येथे  केले जाणार आहे .
रेल्वे स्थानकाजवळील महावीर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.विकेश मुथा त्यांनी दिला. गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेचे व्रत जोपासणाऱ्या महावीर हॉस्पिटलमध्ये डॉ. विकेश मुथा यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या व्याधी सह  संबंधित आजारावर उपचार करणार आहेत. मधुमेहवर  योग्य उपचाराने  मात करता येते असा विश्वास महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मुथा यांनी दिला .
उच्च रक्तदाब, श्वसनाचे आजार ,लिव्हर या सर्वांवर एका छताखाली उपचार केले जाण्याची आपल्याला संधी असणार आहे .प्रत्येक दिवशी सायंकाळी पाच ते सात या वेळात तज्ञ डॉक्टर येथे येऊन आपली सेवा देणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेशी लाळ जोडलेल्या डॉक्टर मुथा यांची या आजाराबरोबरच दारूबंदी याही क्षेत्रात तळमळीने कामकाज सुरू आहे. दारूचे व्यसन लागलेल्या पुरुषांमुळे कित्येक संसार उघड्यावर आले आहेत, हे संसार सावरण्यासाठी अगदी माफक दरात दारूबंदी चे उपचार महावीरच्या दालनात सुरू आहे.
दारू पिणारा कितीही समजून सांगितलं तरी दारूचे व्यसन टाळत नाही मात्र त्यावर समपुदेशन औषधांची मात्रा आणि विश्वास यावर दारूचे व्यसन कमी होत असल्याचा दावा मुथा यांनी व्यक्त केला.उच्च मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विकारांची लक्षणे दिसल्यास तातडीने ९८२२४०३४२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!