शहीद पोलिसांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई शहीद दौड
वडगाव मावळ:
२६,११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेले पोलीस कर्मचारी, अधिकारी तसेच लष्करी अधिकारी यांच्या स्मरणार्थ शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनच्यावतीने सांगली ते मुंबई शहीद दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी २२ रोजी सांगलीत विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे चौकामध्ये सकाळी साडेसहाला दौडीला प्रारंभ होईल. ती २६ रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर पोहोचेल. जवळपास ४७० कि.मी. दौड असून सांगली, आष्टा, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई, खाडी पुलमार्गे, सायन व पुढे मुंबईला पोहोचेल.
दौडीत ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. २५ धावपट्टू मशाल व तिरंगा हातात घेवून शहीदांना अभिवादन करत मार्गक्रमण करतील. गेल्या १२ वर्षापासून  संघटनेच्यावतीने शहीद इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा सांगली ते मुंबई अशी दौड निघणार आहे. दौडीत • अप्पर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल हेही सहभागी होणार आहेत. दौडीत अडीच कि.मी.ची लोकल दौडही निघणार आहे. ती राममंदिर कॉर्नरला संपेल.
मंगळवारी २२ रोजी सांगलीतून प्रारंभ झाल्यावर आष्टा, इस्लामपूर, कराड, तळबीड व रात्री आठला सातारा येथे मुक्काम, २३ रोजी सकाळी दहाला भुईंज, एकला नायगांव, तीनला कापूरहोळ व सायंकाळी सहाला कात्रज येथे मुक्काम, २४ ला सकाळी सातला पुण्यातील मामासाहेब मोहोळ तालीम, साडेआठला देशभक्त केशवराव जेथे चौक, दहाला पोलीस आयुक्त कार्यालय पुणे, साडेआकराला शनिवारवाडा, १२ ला पुणे. मनपा, तीनला पिंपरी चिंचवड, जुना पुणे बेंगळूर मार्गे साडेपाचला देहू रोड, तळेगांव दाभाडे, कामशेत, पानशेत व तेथून रात्रीला नऊला कान्हे फाटा येथे मुक्काम, २५ रोजी पहाटे लोणावळा, खंडाळा, खोपोली पनवेल, कळंबोली, वाशी, चेंबूर येथून माटुंगा येथे मुक्काम, २६ रोजी दादर शिवाजी पार्क, सकाळी साडेसहाला शहीद तुकाराम ओंबाळे स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचेल.
शहीद दौडीत स्वप्नील माने, अमित कांबळे, प्रतीक नलवडे, वैभव आटुगडे, जयदीप घार्गे, आदित्य लोखंडे, विराज पाटील, सेहवाग गोसावी, सत्यजित पाटील, प्रथमेश बनसोडे, अमित सोलनकर, अक्षय पाटील, अजय केंगार, स्वप्नील कोळेकर, इरफान जमादार, चंद्रकांत निवरगी, अमित लेंगरे, विश्वनाथ सुर्यवंशी, मयूर लोंढे, ओंकार सुतार, हर्षद एटम व एकलव्य हाबळे हे सहभागी होणार आहेत. समित कदम, डॉ. चंद्रशेखर हळिंगळी, योगेश रोकडे, इनायत तेरदाळकर, नजीर मुजावर, देवदास चव्हाण, निलेश मिसाळ, घनश्याम उके, ललित छाजेड, दिपक पाटील, पुषण चिकली, उमेश गुड्डी, अजित दुधाळ, सचिन खोंद्रे, विजय लढा, अभिजीत भोईटे यांनी संयोजन केले आहे.
भरत सातकर, सुजित सातकर,  कन्हैया सातकर, रणजित सातकर,तन्मय सातकर यांच्या कडुन सत्कार, त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली.

error: Content is protected !!