वडगाव मावळ:
रयत शिक्षण संस्थेच्या  न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज  च्या सन १९९१-९२च्या इयत्ता दहावी बॅचच्या विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन रविवार दि.१२ नोव्हेंबर ला होणार आहे.
लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणुन रडायचो, पण आता शाळेची आठवणीने रडायला येते,अशा काहीश्या भावना व्यक्त करीत १० (अ), १० (ब), १० (क) मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी ३० वर्षानी भेटणार आहे.
न्यु इंग्लिश स्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज, वडगाव मावळ या शाळेच्या इ.स. १९९१-१९९२ या वर्षीच्या इयत्त १० वी च्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला आहे.. तरी या सोहळ्यास या बॅचच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वा. हॉटेल स्वागत, ब्राम्हणवाडी फाटा, जुना मुंबई-पुणे हायवे, वडगांव मावळ येथे हे स्नेहसंमेलन होणार आहे.

error: Content is protected !!