तळेगाव दाभाडे:
बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात थाळी फेक स्पर्धेमध्ये आपल्या मावळ तालुक्यातील कु.सार्थक (शौर्य) संदीप घोजगे याने सिल्वर मेडल मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.तसेच CISCE च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सार्थक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घोजगे,गणेश थिटे उपस्थित होते.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,”सार्थक याने असेच यश उत्तरोत्तर मिळवत राहो व त्याच्या भविष्यातील प्रयत्नांबद्दल त्याला शुभेच्छा देतो.

error: Content is protected !!