पवनानगर:
वाघजाईवाडी कोथुर्णे, पवनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना थंडी पासून बचावासाठी मायेची ऊब मिळणार आहे. ब्राईट वॉशर्स अँड ड्रायक्लीनर्सचे सर्वेसर्वा सुरज वाळके यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने ब्राईट वॉशर्स अँड ड्राय क्लिनर्स यांच्या तर्फ़े ही  मायेची ऊब दिली आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील पहिली ते चौथी वर्गातील गरजु विद्यार्थी / विद्यार्थिनींना थंडीच्या दिवसात संरक्षणासाठी स्वेटर आणि खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी ब्राईट वॉशर्स अँड ड्राय क्लीनरस यांचे सर्वेसर्व सुरज आनंद वाळके, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे, निवेदक लक्ष्मण शेलार, आडकर सर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक वृंदाकडून या उपक्रमबाबत कौतुक करण्यात  आली. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शालेय नवनवीन उपक्रमाबाबत शिक्षकांनी माहिती दिली.
ब्राईट वॉशर्स अँड ड्रायक्लीनर्सचे सर्वेसर्वा सुरज वाळके म्हणाले,” थंडीचे दिवस सुरू आहे ,थंडीत कुडकुडत येणा-या विद्यार्थीना मायेची ऊब मिळावी यासाठी हा उपक्रम घेतला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले.

error: Content is protected !!