औद्योगिक समन्वयामुळे नूतन अभियांत्रिकी  ठरले राज्यात उत्कृष्ट
तळेगाव स्टेशन:
औद्योगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन नूतन महाराष्ट्र विद्या  प्रसारक मंडळाने गेली वर्षभर सातत्याने विविध आस्थापनांशी  करार केले. विद्यार्थी औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम यातुन उभे राहिले.
कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी सेंट्रल प्लेसमेंट सेल च्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या.याची दाखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर झालेल्या  सर्वेक्षणातून नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय उत्कृष्ट ठरले आणि डेटाकुईस्ट टी – शाळा रोजगार निर्देशांक सर्वेक्षण २०२२ यांच्या वतीने महाराष्ट्रातील पश्चिम भागातील रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा ६ वा क्रमांक आणि  विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा  २५ वा क्रमांक मिळाला आहे.
तसेच शासकीय व निमशासकीय विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये  महाविद्यालयाचा ४५ वा क्रमांक प्राप्त होऊन औद्योगिक समन्वय संस्था म्हणून नूतन संस्थेचा  गौरव केला.       
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होणे यासाठी विविध औदयोगिक समूहासोबत काम करणे अपेक्षित असते. औदयोगिक भेटी, संशोधन कार्य, अंतिम वर्षातील प्रकल्प, उपलब्धीचा एकत्रित वापर, उद्योजकतेचे धडे, कॅ म्पस प्लेसमेंट,  इंटर्नशिप आदी मुद्द्यांवर काम करता यावे म्हणून नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाने एकशे चाळीस हुन अधिक अस्थापनांशी सामंज्यस करार केले.
     संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे,  उपाध्यक्ष गणेश खांडगे,  सचिव संतोष खांडगे,  सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,  नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे,  एनसीईआर च्या प्राचार्या डॉ.अपर्णा पांडे आदि मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!