टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप  ग्रामपंचायत कार्यालयात महिलांसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा असवले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेस उपस्थित असलेल्या महिलांनी पिण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात व वेळेत मिळावे, पाण्याची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी. लाईटच्या होणाऱ्या समस्यांमुळे दैनंदिन जीवनातील अनेक कामाचे  नियोजन कोलमडत आहे, त्यासाठी लाईटीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा यासाठी तत्काळ प्रयत्न करावेत.
अशा अनेक मूलभूत प्रश्नांना महिलांनी मागणी  करीत  खेळीमेळीत  ग्रामसभा संपन्न झाली. जल जीवन मशीनचे काम लवकरच हाती घेऊन पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निरासन केले जाईल.
गावातील लाईटच्या डीपीची क्षमता वाढवण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांशी पाठपुरावा करून डीपींची क्षमता वाढून घेण्यात येईल. त्यामुळे पुढच्या काळात लाईटचा कोळंबा होणार नाही.  येणाऱ्या काळामध्ये अनेक विभागातून महिलांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातील  यावेळी ग्रामसभेमध्ये  बोलताना विद्यमान सरपंच सुवर्णा असवले यांनी आश्वासने दिली आहेत.
यावेळी सरपंच सुवर्णा असवले, ग्रामसेवक सुभाष बांगर, सदस्या प्रिया मालपोटे, प्रतीक्षा जाधव, आशा मदगे, एडवोकेट स्नेहा परदेशी, सुकन्या आंबेकर,  माया ओव्हाळ, अलका आंबेकर, अंजना साबळे,  नंदा जाधव, मुक्ता ननवरे  यांसह आदी महिला बहुसंख्येने ग्रामसभेस उपस्थित होत्या.

You missed

error: Content is protected !!