पवनानगर:
ठाकुरसाई गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे यांची निवड झाली. उपसरपंच मंगल कारके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नारायण बोडके यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
  यावेळी उपसरपंच पदासाठी अरविंद रोकडे व धर्मेंद्र ठाकर यांचे अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली अरविंद रोकडे यांना ५ तर धर्मेंद्र ठाकर यांना ३ मते मिळल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक नंदा बाबर यांनी  उपसरपंचपदी रोकडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.  सरपंच नारायण बोडके, ग्रामपंचायत सदस्य कमल मानकर,निर्मला भोसले,रेखा ठाकर, धर्मेंद्र ठाकर,मंगल कारके रामदास खैरे  उपस्थित होते .
   नवनिर्वाचित उपसरपंच अरविंद रोकडे म्हणाले,” भविष्यात 20% राजकारण  80% समाजकारण  व ठाकुरसाई गेंव्हडे खडक या दोन्ही गावाच्या विकासासाठी  नेहमीच  प्रयत्नशील  असेल सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!