पवनानगर :
शिवणे – सडवली  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सडवली येथील रेखा रामदास थोरवत यांची बिनविरोध निवड झाली. स्थानिक पातळीवर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी सर्वांना संधी मिळावी असा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरपंच अजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत थोरवत यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच अजित चौधरी, उपसरपंच संगिता गायकवाड, नवनाथ साळुंके, महेंद्र वाळुंज, कविता शेठे, मिनाक्षी शिवणेकर आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद भरत शिंदे,मावळ केसरी  पै.खडु वाळुंज, दत्ता ओझरकर, संजय भवार, शिवणे सोसायटीचे संचालक तुकाराम लोहकरे,भागुजी केंडे, चंद्रकांत गराडे, भगवान साळुंखे, दत्तात्रय लगड, शिवाजी जगदाळे, मारुती ओझरकर, अमोल बदर, अतुल शेटे, महेंद्र शिंदे, नवनाथ थोरवत, परशुराम थोरवत, विठ्ठल म्हसुडगे, देविदास साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका विद्या लोखंडे यांनी काम पाहिले.
निवडीनंतर थोरवत म्हणाल्या की, सर्व ग्रामस्थ व सदस्यांना विश्वासात घेऊन प्रलंबित मंजूर कामे पूर्ण केले जातील तसेच जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासकामांसाठी प्रयत्नशील राहील.

error: Content is protected !!