टाकवे बुद्रुक:
पुणे शहर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक अजय गुणाजी पारधे यांच्या चुलतीचे सरस्वती संपत पारधे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झालेले आहे.
कुटुंबावर आणि नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील अजय पारधे यांनी सामाजिक कार्याचे भान राखत तथा समाजाप्रती असणारी आपली निष्ठा जतन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
चुलतीच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यानुमोदन दिनी मावळ तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव पठार (डोंगरवाडी)या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
शालेय उपयोगी साहित्य त्यांनी या शाळेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले.
    आपण समाजाचे नेहमीच देणेकरी असले पाहिजे ही भावना सतत जपण्यासाठी मी माझ्या चुलतीच्या स्मरणार्थ एक छोटीशी मदत या निमित्ताने शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना केलेली आहे.याचे मला निश्चित समाधान वाटते अशी भावना अजय पारधे यांनी व्यक्त केली.
   शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी यांनी या उपक्रमाबद्दल अजय पारधे आणि त्यांच्या कुटुंबाचे या निमित्ताने आभार मानले.

error: Content is protected !!