टाकवे बुद्रुक :
भाजपा टाकवे बुद्रुक-नाणे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रोहिदास राघुजी असवले तसेच मान्या सोमनाथ असवले यांच्या वाढदिवसानिमित्त येथील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या प्रांगणात आयोजित केलेल्या खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमात मानाची पैठणी व सोन्याच्या डोरल्याच्या मानकरी अक्षदा अक्षय पिंगळे ठरल्या. द्वितीय क्रमांक सोन्याची नथ व पैठणी विजेत्या दुर्गा जगताप तर तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला व पैठणी कांचन असवले यांनी जिंकला.
वाढदिवसानिमित्त रोहिदास राघुजी असवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मोबाईलवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, गडकिल्ले, पत्रकारिता व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त रोहिदास असवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी ” रोहिदास असवले म्हणाले समाजातील गरीब गरजूंना मदतीचा हात देणं ही सामाजिक जबाबदारी आहे. वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. मला शुभेच्छा देण्याऱ्या सर्वांचा ऋणी असल्याचे ते बोलले.”
या ठिकाणी सहभागी व उपस्थित महिलांसाठी लक्की ड्रॉ काढण्यात आला. यात एकूण बारा बक्षिसे होती.
यात फ्रीज च्या विजेत्या
रुपाली शंकर गुणाट ठरल्या,
लक्की ड्रॉ विजेत्या व बक्षिसे खालील प्रमाणे
करुणा शर्मा (वॉशिंग मशीन), शांताबाई तुर्डे (एलईडी टिव्ही), स्वाती रावत (शिलाई मशीन), ज्योती सोंडेकर (कुलर), निशा तुपके (टेबल फॅन), कमल भांगरे (मिक्सर), मालताबाई मालपोटे (साऊंड बार), संगीता घोरपडे (इलेक्ट्रिक शेगडी), मंगल मालपोटे (रोटी मेकर) , सुषमा विश्वकर्मा (हॅन्ड मिक्सर) ऋतुजा ताते (इस्त्री).
खेळ रंगला पैठणीचा व लक्की ड्रॉ  कार्यक्रमाचे निवेदन प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांनी केले.
याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,भाजप तालुकाध्यक्ष  रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती पांडाभाऊ ओझरकर,रिपाईचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,
जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी उपसभापती शांताराम कदम,माजी उपसभापती गणेश गायकवाड, माजी सरपंच गणपत सावंत,भाजप महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, ह.भ.प. अर्जुन महाराज खाडे, संचालक संजय असवले, अमित शिंदे, आशा  जाधव, शांताराम  काजळे, गणेश भांगरे,तुकाराम कोद्रे,नामदेव कुंभार,अमोल भोईरकर,गुलाबराव कुंभार, आप्पा तुर्डे,  अभिमन्यू शिंदे,अरूण कुटे,रविंद्र आंद्रे,बाळासाहेब गाडे,रामभाऊ गाडे, मुनावर आतार,किसन ननवरे,तुकाराम असवले,बंडाशेठ असवले,बाळासाहेब घोजगे, विलास लोंढे,प्रकाश देशमुख, मच्छिंद्र जगताप,एकनाथ शेटे,दत्ताभाऊ शेटे,भरत घोजगे,गणेश कल्हाटकर,मधुकर धामणकर,सुरेश आलम,नामदेव गोंटे, बाळासाहेब शिंदे, शोभिनाथ भोईरकर, नारायण जाधव,पुंडलिक खांडभोर,सतीश आलम,तानाजी गोंटे, काळूराम भोईरकर, दादाभाऊ मालपोटे,संभाजी मालपोटे,संभाजी कुटे,नवनाथ आंबेकर,योगेश मालपोटे,बळिराम वाडेकर,गोविंद तांबोळी,संदीप गायकवाड,भरत घोजगे, बाळासाहेब जाधव, काशीनाथ जांभुळकर,साहेबराव आंबेकर,रोहीदास जांभुळकर,अमित शिंदे,सतू दगडे, शंकर असवले,अतुल असवले,रामदास आलम,राजू शिंदे विठ्ठल तुर्डे, प्रकाश कोंडे, रामभाऊ गुणाट, , गोपाळ पिंगळे,सचिन पांगारे, प्रदिप पवार,पांडुरंग आलम,संतोष मोकाशी,कैलास पालवे,योगेश चोरघे,अंकुश चोरघे,समीर जाधव,योगेश शिंदे,चंद्रकांत शिंदे,बाळासाहेब वायकर, नाथा थरकुडे,बाळासाहेब करवंदे,संतोष राक्षे,तुषार जगताप,अविनाश गुणाट,प्रशांत जाधव,गणेश जांभळे,नामदेव खांडभोर यांच्यासह अन्य मान्यवर मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.रोहीदास असवले मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

You missed

error: Content is protected !!