वडगाव मावळ:
महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांची भूमिका मोलाची ठरली आहे. जातीभेदाच्या भिंती पाडून संतांनी राष्ट्र उभारणीचे काम केले. या संतांच्या मांदियाळीत स्त्री संतांची कामगिरी विसरून चालणार नाही. स्री संतांनी समाजाला पंरपरेतून परिवर्तनाकडे नेण्याचे काम केले याचा कित्ता मावळ तालुक्यातील महिला प्रवचनकार व किर्तनकार करीत आहे.
किर्तनकार जयश्रीताई अक्षय महाराज येवले हे मावळ तालुक्यातील महिला किर्तनकार व प्रवचनकार यांच्यात आदराने घेतले जाणारे नाव आहे. आजमितीस मावळ तालुक्याची अनेक कन्या पुढे येऊन वारकरी संप्रदयाचे ज्ञान घ्यावे कीर्तन- प्रवचन च्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे, याकडे सकारात्मक दृष्टीने पुढे येत आहे.
बौर गावातील  ह. भ. प.ज्ञानेश्वरी ताई वायभट याही संत परंपरेच्या वाटेने पुढे जात असून त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केला आहे. युवा किर्तनकार जयश्रीताई येवले  यांच्या कडे त्या शिक्षण  घेत आहेत.
वारकरी संप्रदायाच्या तत्वाचे,नियमांचे काटेकोर पालन करत आहेत त्यांनी आज पाहिले कीर्तन आपल्या स्वतःच्या  बौर गावात केले. खूप सुंदर शब्दात त्यांची किर्तनरुपी सेवा संपन्न झाली. त्या बद्दल गावक-यांनी जयश्रीताई यांचे आभार मानले.
महाराष्ट्रात मुक्ताबाई, जनाबाई, विठाबाई, सोयराबाई, कमळाबाई, गोदामाई, निर्मळा अशा अनेक स्त्री सतांची नावे घेता येतील या संत परंपरेवर मावळ तालुक्यात महिला किर्तनकार  व प्रवचनकार पुढे येऊन वारकरी संप्रदयाचा वारसा जपत आहे,अशा नवोदित किर्तनकार व प्रवचनकार यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
अनेक संत असे होऊन गेले की त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेले नाही. स्त्री संतांचे पैलू अनेकदा वेगववेगळ्या मार्गाने उलगडत जातात. रोजच्या जीवनशैलीतून त्यांनी समाज घडवण्याचे काम किर्तन व प्रवचनातून
केले जात आहे.

error: Content is protected !!