शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात  तहसीलदार  मधुसुदन  बर्गे  यांचे हस्ते पांडुरंगाची  महापूजा
तळेगाव दाभाडे :
कार्तिकी  एकादशी निमीत्ताने  तळेगाव शहरातील  विविध भागातील  श्री विठ्ठल मंदिरांमध्ये  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आहे. तर भाविकांनी  दशॅनासाठीमोठी गर्दी केली होती..
     शाळा  चौकातील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे  मावळ तालुक्याचे. तहसीलदार  मधुसुदन बर्गे यांचे हस्ते  काकड आरती  आणी  पुजा करण्यात आली.  यावेळी  मंदिरात  भाविकांनी  दशॅनासाठी मोठी गर्दी केली होती. 
     मंदिरात पहाटे काकड आरती अभिषेक पुजा  भजन  महाआरती व  प्रसाद वाटप करण्यात आले . दुपारी  ह.भ.प. पांडुरंग   कार्लेकर यांचे प्रवचन  तर ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांचे  कितॅन संपन्न झाले. किर्तनास  भाविकांनी  उस्फूर्त  गर्दी केली होती.
    श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने  मंदिरात  फुलांची सजावट, आणी  विजेची  आकषॅक रोषणाई करण्यात आली होती. तसेच  भव्य रांगोळी  काढण्यात आली होती.दिवसभर भाविक  दशॅनासाठी येत होते.

error: Content is protected !!