कालभैरव जयंती कार्तिक उत्सवा निमित्ताने वडगावात संत ज्ञानेश्वर महाराज कथा ज्ञानामृत सोहळा
वडगाव मावळ:
  श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थान, वडगाव मावळ यांच्या वतीने बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यत  कैवल्याचा पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा, या ज्ञानामृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  ह.भ.प. गणेश महाराज  वाघमारे, ओतूर जुन्नर हे कथेचे निरूपण करणार आहेत.नऊ दिवसांच्या या कार्यक्रमात रोज पहाटे पाच वाजता अभिषेक,महापूजा,आरती  आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज कथा संपन्न होणार आहे.
बुधवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १२ या वेळेत कालभैरवनाथ जयंती निमित्त देवजन्माचे कीर्तन होणार असून गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०ते १२ या वेळेत ह भ प गणेश महाराज वाघमारे यांचे काल्याचे किर्तन  होणार असून महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशाआप्पा ढोरे अनंता कुडे,किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अशोकराव ढमाले,तुकाराम काटे, अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आणि ग्रामस्थ करीत आहेत.

error: Content is protected !!