तेजोमयी वातावरणात तळेगावात साकारले पंढरपूर!दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर!
  तळेगाव दाभाडे:
  ‘ दिवे लागले रे, दिवेलागले तमाच्या तळाशी दिवे लागले या उक्तीप्रमाणे जीवनातील अंधःकार दूर सारून आपले आत्मरूप जागविण्याची ताकद दीपोत्सवात आहे. या जाणिवेतून श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४१०० दिव्यांच्या तेजोमय वातावरणात श्री डोळसनाथ महाराज मंदिरात रंगावलीच्या रूपात साक्षात पंढरपूर अवतरले होते.
याप्रसंगी माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, आमदार सुनिल शेळके, श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरुण माने, अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे, प्राची हेंद्रे,सुनिता काळोखे,शैलजा काळोखे,ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सरोदे, हभप ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे, दिलीप शहा,यतीन शहा,हेमंत दाभाडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल  पारगे,उपाध्यक्ष निलेश राक्षे, विकास  कंद,सचिव अतुल राऊत,खजिनदार कौस्तुभ भेगडे संचालक,शरद भोंगाडे,अंकुश आंबेकर,आशिष  खांडगे, संध्या देसाई,मेघा भेगडे, अनिल पवार, शंकर भेगडे, समीर भेगडे, वैभव भेगडे, विजय भेगडे, प्रवीण मु-हे, दत्तात्रय ज्ञानेश्वर भेगडे, अमित भसे,अरविंद गद्रे,राकेश  खळदे,दिनकर भेगडे, अभिषेक  मराठे,डॉ शाळीग्राम भंडारी,महेश शहा, विलास भेगडे,चंद्रजीत वाघमारे,संजय ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री डोळसनाथ महाराज पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, मावळचे आमदार सुनील शेळके,माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमदार सुनीलअण्णा शेळके व माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
उठा जागे व्हारे आता l स्मरण करा पंढरीनाथा ll अनेक रंजल्या गांजलेल्यांच्या व्यथा हरण करणारा आपला देव म्हणून श्रीविठ्ठल जनमानसात ठसलेला आहे. याचाच आधार घेऊन त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त श्री पांडुरंगाची फुलांची आणि रांगोळीची नयनरम्य आरास श्री डोळसनाथ महाराज मंदिरात करण्यात आली होती.त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या व रांगोळीच्या आकर्षक सजावटीमधून श्री पांडुरंगाची प्रतिकृती साकारण्यात आली. जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला केलेली सामुदायिक वारी विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते.या  संकल्पनेतून रांगोळीच्या अवतीभोवती तब्बल ४१०० आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. व संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी सर्वसामान्यांच्या आस्थेच्या विषयांना आकर्षक सजावटीच्या स्वरूपात साकारले जाते. हे दोन्ही संस्थांचे विशेष वैशिष्ट्य आहे.
उपक्रमाचे आयोजक व नगरसेवक संतोष भेगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी तळेगाव पंचक्रोशीतील ९ ते १० हजार भाविक व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. गेल्या सहा वर्षांपासून साकारत असलेल्या या आगळ्या वेगळया उपक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांनी नागरिकांचे आभार मानले.
यावेळी श्री बनेश्वर महादेव मंदिर येथे १००० हजार दिव्यांची सजावट करून १२ ज्योर्तिलिंगांपैकी प्रमुख असलेल्या मध्यप्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालाची सजावट करण्यात आली होती यावेळी मंदिरात श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

error: Content is protected !!