अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर
वडगाव मावळ:
मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष पदी शांताराम बोडके यांची निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष अनिल वाळके यांच्या अध्यक्षतेखालीआणि सहजिल्हाध्यक्ष विजय  पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
मावळ तालुका अध्यक्ष  शांताराम बोडके यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
        वारकरी सांप्रदायात मावळ तालुक्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संघटन मोठ्या प्रमाणात असुन मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजीक उपक्रम राबविले जातात . त्यात प्रामुख्याने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वारकरी शिक्षण, व्यसनमुक्ती, आरोग्य, गोरक्षा आदींसह पर्यावरण आणि गरीब – गरजुंना मदत केली जाते.हे कार्य अविरत चालू रहावे म्हणुन गाव तेथे अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहसचिव दिनकर निंबळे यांनी सांगितले.
  शांताराम बोडके (अध्यक्ष), लक्ष्मण तळावडे( मुख्यसचिव ), नारायण केंडे (कोषाध्यक्ष ) सचिन ठाकर(प्रसिद्धी प्रमुख) अनुसया म्हस्के ( मार्गदर्शक ) तर
  वारकरी शिक्षण समितीत नंदाराम जाधव, संजय बांदल, विश्वनाथ वाळुंजकर
   स्वच्छता व व्यसनमुक्ती समितीत नंदाराम धनवे, बळीराम ढोले, शंकर मराठे
   सार्वजनिक मंदिर समितीत शिवाजी राक्षे, सुखदेव गराडे, संजय खेंगले, बाजीराव ढोरे
   सप्ताह व दिंडी समितीत बाळासाहेब गायकवाड, शंकर ढोरे, संजय ढोरे
   वारकरी सेवा समितीत गोरख घोजगे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब गाडे, योगेश भांगरे,
   महिला व बालसंस्कार समितीत संगिता फाळके, छाया काकरे, सुमन घरदाळे, सारीका निकम, सुषमा ओझरकर, कमल काकरे, मालन ढोरे, लक्ष्मी पऱ्हाड , सखु तिकोणे
   युवा समितीत भाऊसाहेब काटे, शंकर लोहोर, भाऊसाहेब आंभोरे, गोरख तरस
   आरोग्य समितीत आत्माराम शिंदे, विलास घारे, उद्धव कारके, शांताराम वायभट  काशिनाथ भोंडवे, साहेबराव देशमुख, जगन्नाथ घारे, गणेश घोजगे यांची निवड करण्यात आली आहे.
        कोषाध्यक्ष भरत वरघडे, दतोबा भोते, नियोजन समिती सदस्य कुलदीप बोडके, तुकाराम भांगरे, विजय गाडे, दत्ता कड , सोपान खराबी मंडळाच्या या  पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. आत्माराम शिंदे यांनी सुत्र संचालन केले. दिनकर निंबळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .

error: Content is protected !!