मावळ लेणी संवर्धकांतर्फे बेडसे बौद्ध लेणी, मावळ, पुणे येथे लेणी बनवा स्पर्धा व लेणी चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न.
वडगाव मावळ:
       महाराष्ट्राला हजारो प्राचीन बौद्ध लेण्यांचा दैदिप्यमान वारसा लाभला आहे. लहानपणीच आपल्या मुलांवर इतिहासाचा संस्कार व्हावा, आपण ज्या प्रदेशात राहतो तिथला इतिहास कसा घडला भूगोल कसा आहे ह्या गोष्टी लहानपणापासून मुलांना समजल्या तर त्यांची सामाजिक जडणघडण नक्कीच चांगल्या वळणाने होते.
       लहान मुलांमध्ये बौद्ध लेणी, स्तूप यांची ओळख व्हावी व भारताचा हा सम्रृद्ध वारसा जपण्याची व प्राचीन इतिहास अभ्यासण्याची भावना निर्माण व्हावी यासाठी मावळ लेणी संवर्धक, पुणे, महाराष्ट्र यांच्याकडून “लेणी बनवा व लेणी चित्रकला” या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील 60 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
        या स्पर्धेत भारतातील विविध लेण्यांच्या व स्तूपांच्या मातीतील प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तसेच विविध लेण्या व स्तूपांची चित्रे साकारण्यात आली होती.
      या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे –
लेणी बनवा स्पर्धा –
प्रथम क्रमांक- सोहम गणेश थोरात, चाकण, पुणे
व्दितीय क्रमांक- तन्मय बजरंग कांबळे, परंदवडी, मावळ
तृतीय क्रमांक- कावेरी कैलास गायकवाड, मोहितेवाडी, मावळ
लेणी चित्रकला स्पर्धा –
प्रथम क्रमांक- तेजस जयवंत ओव्हाळ, कान्हे, मावळ
व्दितीय क्रमांक- श्रावस्ती राजेंद्र अहिवळे, फलटण, सातारा
तृतीय क्रमांक- जय सचिन साळवे, पंढरपूर, सोलापूर
      विजेत्यांना लेणी अभ्यासक सुरज जगताप सर व अजय पवार सर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सदर पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी बेडसे बौद्ध लेणी, मावळ येथे पार पडला.
     लेण्यांबद्दल सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी, यासाठी मावळ लेणी संवर्धक, पुणे, महाराष्ट्र हि संघटना सतत प्रयत्नशील असते.

error: Content is protected !!