कामशेत : सांगिसे ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उपक्रमानिमित्त ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलांनी सजवलेल्या पालखीतून ग्रंथाची मिरवणूक गावात काढली.तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ,पखवाज,मृदंगाच्या साथीने भजनाचे उत्तम सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.याचबरोबर ग्रंथादिंडीच्या औचित्याने भक्तीमय घोषणांनी व गीतांनी परिसर दुमदुमून गेला. यासोबतच मराठी भाषा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत वत्कृत,निबंध व वाचन व चित्रकला इत्यादी स्पर्धांचेही यशस्वी आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
    कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड व सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सुनिता वंजारी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचलन अनिल शिंदे, अंबादास गर्जे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर अरनाळे, सविता शिंदे,दशरथ ढोरे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!