तळेगाव दाभाडे: भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात शहर विद्यार्थी आघाडीने स्व:खर्चाने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अंदोलन घेण्यात आले होते.
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे व वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाला वारंवार सांगून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष होत असल्याने खांडगे पेट्रोल पंप येथील रस्त्यावर पडलेले खड्डे स्व खर्चाने बुजून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे नियमित कर आकारणी करून सुद्धा मूलभूत नागरी सुविधांपासून तळेगाव दाभाडे मधील नागरिक वंचित आहेत. यांमुळे गांधीगिरी पध्दतीने हे आंदोलन केल्याचे विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात , भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे , तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील , सरचिटणीस विनायक भेगडे ,सरचिटणीस स्वप्नील भेगडे,महिला आघाडी अध्यक्षा शोभा परदेशी,सरचिटणीस शोभा भेगडे,स्वप्नील सुतार, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष रोहन जाधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
- तळेगाव चाकण रस्त्यावर अवेळी धावणा-या कंटेनरला लगाम कधी?
- बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये’स्पेस ऑन व्हील्स’ हा अनोखा उपक्रम
- पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण – दादा वेदक
- संस्कार प्रतिष्ठानच्या यशात मानाचा तुरा