वडगाव.मावळ:

भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ एप्रिल रोजी भाजपाच्या सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष संमेलन होणार आहे.मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली.या बैठकीत या मेळाव्याची पूर्वतयारी करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली 

मावळ भाजपच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वा.गुरुदत्त मंगल कार्यालय नायगाव ( कामशेत ) येथे सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्षांचा मेळावा महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी दिनेश शर्मा  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे व तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी दिली.

तसेच या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस श्री.विक्रांत दादा पाटील,विभागीय संघटनमंत्री श्री.मकरंदजी देशपांडे साहेब, मा.राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री.गणेश भाऊ भेगडे व पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष श्री.शरदजी बुट्टे पाटील ई मान्यवर देखील उपस्थित राहणार असून मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व सुपर वॉरियर्स,बूथ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मावळ भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.! 

यावेळी ज्येष्ठ नेते श्री.निवृत्ती  शेटे, प्रभारी भास्करराव  म्हाळसकर,जेष्ठ नेते श्री.राजाराम  शिंदे, श्री.ज्ञानेश्वर दळवी साहेब, ता.अध्यक्ष श्री.दत्तात्रय गुंड, जेष्ठ नेते श्री.शिवाजी टाकवे , मा.सभापती श्री.गुलाबराव  म्हाळसकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामदास गाडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री.रघुवीर शेलार,भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य श्री.जितेंद्र  बोत्रे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब घोटकूले,भाजपा पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष श्री.किरण राक्षे, भाजपा पुणे जिल्हा ओबीसी आघाडी अध्यक्ष श्री.दत्तात्रय माळी, ता.सरचिटणीस श्री.अभिमन्यू  शिंदे, श्री.सचिन येवले , महिला आघाडी अध्यक्षा सौ.सायली बोत्रे , वडगाव शहर भाजपा नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.संभाजी म्हाळसकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री.अभिजीत नाटक ,लोकसभा विस्तरक श्री.भूषण जोशी , मावळ विधानसभा विस्तारक श्री.रविंद्र देशपांडे,यांच्यासह मावळ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!