तळेगाव दाभाडे: 

 येथे  रविवार दि. १४/०४/२०२४ रोजी भरणा-या  आठवडे बाजाराच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.नगरपरिषदेने या बाबतीत प्रसिद्धीस पत्र दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, दि. १४/०४/२०२४ रोजी रविवारी भरणा-या शहराच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येत असून, रमाकांत तरुण मंडळ तळेगाव दाभाडे यांचे कडून दि.०२/०४/२०२४ रोजी पत्र प्राप्त झाले आहे. 

सदर पत्रामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहोत्सव २०२४ साजरा करणेत येणार आहे. व सदर कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ढोल, लेझीम व बँन्ड या पारंपारिक वाद्यांसह तळेगाव दाभाडे शहराच्या मुख्य बाजारपेठेतून होणार आहे.

त्याअनुषंगाने नागरीक, व्यवसायिक, विक्रेते, व्यापारी यांची गैरसोय होऊ नये याकरिता, रविवार दि. १४/०४/२०२४ रोजीचा आठवडे हा म्ख्य बाजारपेठेत न भरविता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानामध्ये भरविला जाणार आहे, 

याची सर्व नागरीक, व्यवसायिक, विक्रेते, व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत करणेत येत आहे.

error: Content is protected !!