तळेगाव दाभाडे :
माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खांडगे कुटूबियांची सांत्वन भेट घेत शोक भावना व्यक्त केल्या. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, वसंतराव (दादा) मामासाहेब खांडगे (वय ८९) यांचे बुधवारी ता.७ ला निधन झाले.
या पार्श्वभूमीवर माजीमंत्री पाटील यांनी मामासाहेब खांडगे नगर येथील खांडगे निवास येथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे व कुटूबियांची भेट घेतली.
कै.वसंतराव (दादा) खांडगे यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक, राजकीय क्षेत्रात योगदान राहिले आहे. ते उत्कृष्ट मृदंग वादक होते. या विषयीच्या अनेक आठवणींना या भेटीत उजाळा देण्यात आला.
यावेळी खांडगे कुटूबियांतील सर्व सदस्य व आप्तस्वकीय उपस्थित होते.मावळ तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात खांडगे कुटूबियांचे मोठे योगदान आहे.कै.मामासाहेब खांडगे हे काँग्रेसचे नेते होते.ते जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते कै.यशवंतराव चव्हाण ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचा स्नेह राहिला.अनेक सामाजिक संस्थाना त्यांनी बळकटी दिली.
कै.मामासाहेब खांडगे यांच्या जडणघडणीत घडलेले कै.वसंतराव (दादा ) यांचे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय योगदान सर्वश्रुत आहे.माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि कै.वसंतराव (दादा) खांडगे यांचा जिव्हाळा होता .माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांनी साश्रू नयनांनी दादांना निरोप दिला.
या सर्व पार्श्वभूमीवर कै.वसंतराव (दादा) खांडगे यांच्या अंत्यविधी प्रसंगी माजीमंत्री मदन बाफना ,माजीमंत्री बाळा भेगडे,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईरकर,शिवसेनेचे संघटक संजोग वाघीरे,सहकारमहर्षी माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी ,कार्यकर्ते,मित्रपरिवार व आप्तेष्ट सगेसोयरे उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस