तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपमुख्याधिकारी ममता राठोड व महिला बालकल्याण अधिकारी सुवर्णा काळे यांची नवीन समर्थ विद्यालयाला भेट
तळेगाव स्टेशन:
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे यांच्या समवेत ममता राठोड मॅडम व सुवर्णा काळे यांनी नवीन समर्थ विद्यालयास सदिच्छा भेट दिली. नवीन समर्थ विद्यालयातील अण्णा विजापूरकरांना त्यांनी अभिवादन केले. सर्व इतिहास सौ प्रभा काळे यांनी सांगितला.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राठोड व काळे यांनी मार्गदर्शन केले.
ममता राठोड म्हणाल्या,” या परीक्षा देताना सराव फार महत्त्वाचा आणि गरजेचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट असे सांगून त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नवीन समर्थ विद्यालयाच्या प्राचार्य वासंती काळोखे यांनी ममता राठोड व सुवर्णा काळे यांचे स्वागत सत्कार करून आभारही मानले. विद्यालयाचे पर्यवेक्षक रेवप्पा शितोळे उपस्थित होते.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित