पुणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आढावा बैठक खामशेत येथे संपन्न
कामशेत:
पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती मावळ, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व मावळ तालूका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खामशेत येथील सुमन रमेश तुलसानी टेक्निकल कॅम्पस मध्ये भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शना बाबतची आढावा बैठक महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी प्रणिता नाईक -कुमावत, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे, विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास एकाड, तालुकाध्यक्ष सुरेश सुतार, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शन हे दि. १८,१९ व २० रोजी भरविण्यात येणार असून जिल्यातील १३ तालुक्यातील प्रथम, द्वितीय  व तृतीय क्रमांक मिळविलेला प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत. प्रथमच दिव्यांग व आदिवासी गटातून प्रकल्प सादर होणार आहेत.  या प्रदर्शनात ११० विद्यार्थी व ४८ परिचर व विज्ञान शिक्षक प्रकल्प सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी दिली.

error: Content is protected !!