
तळेगाव दाभाडे:
येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने सदगुरू ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर गुरूजी यांची पुण्यतिथि उत्साहाने साजरी करण्यात आली.
श्री विठ्ठल मंदिरात पहाटे पुजा, काकड आरती,भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदगुरू रंगनाथ महाराज परभणीकर यांचे प्रतिमेचे पूजन लक्ष्मण महादु भेगडे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रामदास गवारे,किरण गवारे,अतुल देशपांडे, विणेकरी संपतराव गराडे, ह.भ.प. निवृत्ती महाराज फाकटकर, पांडुरंग गदादे,सुभाष बेल्हेकर, छबुराव भेगडे, प्रकाश वालझाडे, हरिदास वनारसे, द्वारकानाथ थोरात,अरविंद हांडे पाटील, किशोर दरेकर आदीं भजनकरी उपस्थित होते तर श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे, ज्ञानेश्वर महाराज माऊली दाभाडे यांनी परभणीकर महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,यतिनभाई शहा यांनी केले होते.महाआरती व प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.
- वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळास्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन
- मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके
- प्रगतीशील शेतकरी चिंधू वाळुंज यांचे निधन
- सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा
- जीवनगाथा बहिणाबाईंची’ : १९ एप्रिलला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार




